प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
(AI for Administration)
"प्रशासनातील कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणल्याने निर्णय प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम बनते, ज्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकाला न्याय आणि सुव्यवस्था मिळवून दिली जाऊ शकते."
©2025CEOZillaParishad Sangli. All Rights Reserved
मनोगत
आज आपण ज्या काळात कार्यरत आहोत, तो केवळ डिजिटल युग नाही, तर 'स्मार्ट व्यवस्थापनाच्या' दिशेने वाटचाल करणारे युग आहे. या युगात माहिती हीच खरी संपत्ती मानली जाते आणि ती माहिती योग्य पद्धतीने, योग्य वेळी व योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची साथ आवश्यक आहे. यातच पुढचा टप्पा म्हणजे – कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI).
शासनाच्या प्रशासन यंत्रणेमध्ये आता यंत्रणा, निर्णयप्रक्रिया, संवाद व अंमलबजावणी यासाठी फक्त मानवी क्षमतेवर विसंबून न राहता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून प्रशासन अधिक सक्षम, गतिमान व उत्तरदायी बनवण्याची गरज आहे. यासाठीच सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने, सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत माहिती, प्रशिक्षण आणि प्रेरणा देण्यासाठी एक सर्वसमावेशक ई- पुस्तिका तयार करण्यात येत आहे.
‘AI’ ही संकल्पना केवळ शास्त्रीय प्रयोगापुरती मर्यादित नाही, ती आता आपल्या दैनंदिन शासकीय कामांमध्येही प्रवेश करत आहे. Google Search मध्ये योग्य माहिती मिळवणे, Excel मध्ये डेटा विश्लेषण करणे, Gmail मध्ये स्मार्ट रिप्लाय, मोबाईलवर व्हॉइस कमांड – हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेचेच प्रकार आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण आपल्या कार्यालयीन कामकाजात शिस्तबद्ध व योजनाबद्ध पद्धतीने केला, तर निश्चितच आपली सेवा कार्यक्षमता, पारदर्शकता आणि निर्णयक्षमतेच्या दिशेने एक मोठी उडी घेईल.
या पुस्तिकेमध्ये लिपिक वर्ग, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, शाखाधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांसारख्या प्रत्येक स्तरातील कर्मचाऱ्यांना समजेल अशा पद्धतीने – AI म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा, कोणती टूल्स वापरता येतील, त्या टूल्सचे सरावप्रश्न, प्रत्यक्ष उपयोगाचे उदाहरणे – यांचा समावेश करण्यात आला आहे.
उदाहरणार्थ, एक लिपिक AI चा वापर करून शासकीय पत्र तयार करू शकतो. गटविकास अधिकारी तालुक्यातील योजनांचा प्रगती अहवाल ChatGPT च्या मदतीने तयार करू शकतो. ग्रामसेवक Canva च्या साह्याने ग्रामसभेचे आमंत्रणपत्र आकर्षक पद्धतीने तयार करू शकतो. मुख्याध्यापक Google Forms वापरून पालकांच्या सूचना गोळा करू शकतो. हाच आहे AI चा सकारात्मक, कृतीशील आणि प्रत्यक्ष उपयोग!
या मार्गदर्शकाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील भाषा ही प्रशासकीय असूनही क्लिष्ट नाही. ती संवादात्मक आहे, अनुभवांवर आधारित आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणारी आहे. तांत्रिक संज्ञांना मराठीत समजेल अशा उदाहरणांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक टूलसाठी 'हे काय आहे?', 'हे का वापरावे?' आणि 'हे कसे वापरायचे?' या तीन मूलभूत प्रश्नांवर आधारित माहिती दिलेली आहे.
माझी प्रामाणिक अपेक्षा आहे की ही पुस्तिका प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलावर, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कामाच्या पद्धतीत रुजावी. AI ही केवळ सल्लागार बुद्धिमत्ता नसून, ती सहकारी बनून आपली दैनंदिन जबाबदारी हलकी, प्रभावी आणि सुसंगत बनवू शकते.
आपण सर्वांनी मिळून हे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करावे, आणि 'तंत्रज्ञानस्नेही, सक्षम, लोकाभिमुख आणि परिणामकारक प्रशासन' घडवण्यासाठी ही पुस्तिका एक दिशा आणि दीपस्तंभ ठरो, हीच माझी अपेक्षा.
आपल्या अथक प्रयत्नांना कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक धार देईल, असा माझा ठाम विश्वास आहे.

आपली,
श्रीम तृप्ती धोडमिसे (भा.प्र. से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, सांगली
अनुक्रमणिका

1. मूलभूत संकल्पना
कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक अशी संकल्पना आहे, जी माणसाच्या विचारशक्तीला आणि निर्णय क्षमतेला संगणकाद्वारे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक, मोबाइल किंवा इतर यंत्रणांना माणसासारखं विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणं.
ब्लॉकचेन ही एक डिजिटल तंत्रज्ञान प्रणाली आहे जिथे माहिती ब्लॉक्स म्हणून साठवली जाते आणि ती एकमेकांना चेनसारखी जोडलेली असते. ही साखळी एकदा तयार झाली की, त्यातील माहिती कुणीही सहज बदलू शकत नाही – त्यामुळे ती खूप सुरक्षित व पारदर्शक (transparent) असते.
Internet of Things (IoT) म्हणजे "इंटरनेटशी जोडलेल्या वस्तूंचं जाळं". यात अशी अनेक उपकरणं (जसं की सेन्सर्स, स्मार्ट यंत्र, मोबाईल्स, वाहनं, मशीन, गॅझेट्स इ.) समाविष्ट असतात जी इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात आणि स्वतःच निर्णय घेऊन कृती करतात.
ब्लॉकचेन म्हणजे काय?
ब्लॉकचेन ही एक डिजिटल तंत्रज्ञान प्रणाली आहे जिथे माहिती ब्लॉक्स म्हणून साठवली जाते आणि ती एकमेकांना चेनसारखी जोडलेली असते. ही साखळी एकदा तयार झाली की, त्यातील माहिती कुणीही सहज बदलू शकत नाही – त्यामुळे ती खूप सुरक्षित व पारदर्शक (transparent) असते.
ब्लॉकचेनची मुख्य वैशिष्ट्ये:
पारदर्शकता (Transparency)
सर्व व्यवहार (Transactions) सार्वजनिकरित्या पाहता येतात. फसवणूक किंवा लपवाछपवी करणे कठीण.
सुरक्षितता (Security)
प्रत्येक ब्लॉकमध्ये 'कोड' असतो, जो फसवणूक टाळतो. एकदा माहिती नोंदवल्यानंतर ती सहज बदलता येत नाही.
वितरित प्रणाली (Decentralized System)
माहिती एकाच संगणकावर न ठेवता जगभरातील अनेक संगणकांवर ठेवली जाते. त्यामुळे सिस्टम बंद पडल्यासही माहिती सुरक्षित राहते.
प्रशासनात ब्लॉकचेनचा उपयोग
सोपं उदाहरण: समजा, एखादी गावाची मालमत्ता माहिती ब्लॉकचेनमध्ये नोंदली आहे. जर त्या मालमत्तेचा व्यवहार झाला, तर ती माहिती पुढील ब्लॉकमध्ये जाईल आणि ती मागच्या माहितीला जोडलेली असेल. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याने ती माहिती बदलू शकत नाही.
ब्लॉकचेन आणि AI एकत्र वापरल्यास निर्णय घेणं, फसवणूक ओळखणं आणि माहितीचे विश्लेषण करणं अधिक प्रभावी होऊ शकतं. ब्लॉकचेन हे भविष्यातील सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान आहे. शासकीय यंत्रणेत त्याचा वापर केल्यास प्रशासन अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि कार्यक्षम बनेल.
Internet of Things (IoT) – गोष्टींचं इंटरनेट
आजचं प्रशासन हे स्मार्ट होत चाललं आहे. परंपरागत पद्धतींऐवजी आधुनिक, डिजिटल आणि बुद्धिमान तंत्रज्ञान यांचा वापर वाढतो आहे. अशातच एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे "Internet of Things (IoT)", ज्याचा प्रभावी वापर शासकीय सेवांमध्ये करता येतो.
IoT म्हणजे "इंटरनेटशी जोडलेल्या वस्तूंचं जाळं". यात अशी अनेक उपकरणं (जसं की सेन्सर्स, स्मार्ट यंत्र, मोबाईल्स, वाहनं, मशीन, गॅझेट्स इ.) समाविष्ट असतात जी इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात आणि स्वतःच निर्णय घेऊन कृती करतात.
उदाहरणार्थ:
  • पाण्याची टाकी भरली की सेन्सरद्वारे माहिती मिळते आणि पंप थांबतो.
  • गाडीमध्ये GPS आहे, ती कुठे आहे हे आपण मोबाईलवर पाहू शकतो.
  • घरात एसी आहे जो खोलीचे तापमान वाढल्यावर आपोआप सुरू होतो.
प्रशासनात IoT चा वापर
नगरपरिषद / ग्रामपंचायतीत
  • कचराकुंडीत सेन्सर बसवून भरल्यावर सूचना मिळवता येते.
  • सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वच्छतेचा अलर्ट.
पाणीपुरवठा व जलसंधारण
  • टाकीतील पाणी पातळीचा सेन्सर – ओव्हरफ्लो रोखता येतो.
  • शेतात जमिनीतील आर्द्रतेनुसार ठिबक सिंचन सुरू.
आरोग्य विभागात
  • रूग्णांच्या हृदयगती, ऑक्सिजन लेव्हल सेन्सरद्वारे ट्रॅकिंग.
  • आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलला तत्काळ अलर्ट.
IoT कसे कार्य करते?
Sensors / Devices (संवेदक)
माहिती गोळा करतात (जसे तापमान, आर्द्रता, चळवळ)
Connectivity (जोडणी)
ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून पुढे पाठवली जाते.
Data Processing & Action (प्रक्रिया व कृती)
माहितीवर प्रक्रिया होते आणि आवश्यक तेव्हा यंत्र स्वतः कृती करते – उदा. पंप बंद करणे, अलार्म वाजवणे.
IoT च्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म:
2. कृत्रिम बुद्धिमत्ता-अर्थ, प्रकार, गरज, वापर
"बुद्धी" ही माणसाच्या कार्यक्षमतेची खरी ओळख असते. आणि जेव्हा ही बुद्धिमत्ता संगणक किंवा यंत्रामध्ये निर्माण केली जाते, तेव्हा तिलाच आपण 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणतो. AI (Artificial Intelligence) म्हणजे अशी संगणकीय प्रणाली जी माणसासारखं विचार करू शकते, शिकू शकते, संवाद साधू शकते आणि निर्णय घेऊ शकते.
सोपा उदाहरण: आपण Google ला विचारतो, "उद्या हवामान कसं असेल?" आणि उत्तर क्षणात मिळतं – हे AI चं कमालच आहे.
AI मुळे शासकीय कामं अधिक गतीशील, प्रभावी आणि सुटसुटीत होतात.
काही लोकांना वाटतं की AI मुळे नोकऱ्या कमी होतील. पण हे खरं नाही. AI हे एक सहाय्यक साधन आहे – जे आपलं काम सोपं करतं, आपल्याला चांगले निर्णय घ्यायला मदत करतं. काम करणाऱ्या व्यक्तीचा अनुभव आणि समज हीच खरी ताकद असते – AI फक्त ती अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यास मदत करतं.
AI चे प्रकार
मशीन लर्निंग (Machine Learning)
यामध्ये संगणक आपल्याला दिलेल्या माहितीवरून शिकतो आणि त्यावरून निर्णय घेतो.
  • संगणक डेटावरून शिकतो, पॅटर्न (नियम) ओळखतो आणि पुढील वेळी तोच वापरून निर्णय घेतो.
  • माणसाने नियम सांगितले नाहीत, संगणकानेच शिकून उत्तर दिलं.
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP)
म्हणजे संगणक आपली भाषा समजतो – उदा. आपण ChatGPT ला विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर.
  • संगणक माणसाची भाषा समजतो, त्यावर प्रक्रिया करतो आणि योग्य प्रतिसाद देतो.
  • वाक्यातील शब्दांचा अर्थ, व्याकरण, भावार्थ समजून योग्य उत्तर तयार करतो.
जनरेटिव AI
यामध्ये संगणक नवीन लेख, चित्रं, उत्तरं तयार करतो – जसं की Canva AI किंवा ChatGPT वापरून तयार होणारे अहवाल व पत्र.
  • आधीच्या माहितीवरून नवीन गोष्टी तयार करू शकते – लेख, चित्र, व्हिडिओ, कोड, आवाज, प्रश्नोत्तर.
  • संगणक केवळ माहिती ओळखत नाही, तर नवीन माहिती तयार करतो.
नियमाधारित AI (Rule-based AI)
अशी कृत्रिम बुद्धिमत्ता जी माणसाने आधीच ठरवून दिलेल्या नियमांनुसार काम करते.
  • "जर A घडलं, तर B करा" अशा स्वरूपाचे ठराविक नियम असतात.
  • संगणक त्यानुसार निर्णय घेतो, त्यात तो स्वतः काही नवीन शिकत नाही.
प्रशासनात AI ची गरज
वेळेची बचत
AI मुळे कामात झपाट्याने गती येते.
चुका कमी होतात
मॅन्युअल टायपिंग/लेखन चुका कमी होतात.
बुद्धिमान विश्लेषण
मोठ्या डेटावर आधारित निर्णय शक्य होतो.
कामात सुसूत्रता
नियोजन, पत्रव्यवहार, रिपोर्टिंग अधिक प्रभावी.
कौशल्याचा विकास
कर्मचाऱ्यांमध्ये डिजिटल आत्मविश्वास वाढतो.
3. AI मधील संज्ञा : Prompt, Response
Prompt म्हणजे काय?
Prompt म्हणजे आपण AI ला दिलेली सूचना, प्रश्न किंवा आदेश. AI त्या सुचनेनुसार आपलं उत्तर तयार करतं.
उदाहरण: "ग्रामपंचायतीसाठी पाणी टंचाई विषयक निवेदन लिहा."
Response म्हणजे काय?
Response म्हणजे AI ने त्या Prompt वर दिलेलं उत्तर. हे उत्तर लेख, पत्र, यादी, अहवाल अशा कोणत्याही स्वरूपात असू शकतं.
उत्तर: "मा. सरपंच, संदर्भ: आमच्या गावात मार्च महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा ही विनंती..."
चांगला Prompt लिहिण्याचे नियम
सोप्या आणि स्पष्ट शब्दांत लिहा
जसे आपण एखाद्या व्यक्तीला समजावून सांगतो तसं AI ला सांगा.
काय हवंय ते स्पष्ट करा
विषय, उद्देश, वापर कोणासाठी आहे हे लिहा.
मराठीत किंवा हव्या त्या भाषेतच लिहा
ज्या भाषेत उत्तर हवं, त्याच भाषेत विचारा.
उदाहरणे द्या किंवा संदर्भ मांडा
AI ला संदर्भ समजतो आणि उत्तर अधिक चांगलं होतं.
स्वतः प्रश्न तपासा
"मी विचारलेलं स्पष्ट आहे का?" स्वतःला विचारा.
वाईट आणि चांगले Prompt उदाहरणे
चांगला Prompt म्हणजे संवादाची गुरुकिल्ली. तो जितका स्पष्ट, तितकं उत्तर प्रभावी!
4. AI टूल्स: मूलभूत, मोफत आणि प्रगत

मूलभूत टूल्स (Basic)
साधी, सहज वापरता येणारी टूल्स
  • Google Translate
  • Google Voice Typing
  • Google Search
  • Gmail Smart Reply

मोफत टूल्स (Free)
अधिक कार्यक्षम आणि मोफत सुविधा
  • ChatGPT
  • Google Forms
  • Google Docs (AI features)
  • Canva AI
  • Grammarly
  • iLovePDF
  • Gemini (Google Bard)

प्रगत टूल्स (Advanced)
व्यावसायिक किंवा मोठ्या प्रकल्पांसाठी
  • Microsoft Copilot
  • Notion AI
  • ChatGPT Plus (GPT-4)
  • Otter.ai
  • Trello AI Plugin
मोबाइल अ‍ॅप्स आणि पोर्टल्स द्वारे वापर
मोबाईल अ‍ॅप्सद्वारे वापर
  • ChatGPT App - पत्र, निबंध, WhatsApp संदेश
  • Google Translate App - GR समजून घेणे, भाषेतील अडचण दूर
  • Canva App - प्रशासकीय जनजागृतीसाठी
  • Google Forms App - लोकमत, तक्रारी, अभिप्राय
  • Grammarly Keyboard App - मेल/पत्र लेखनात शुद्धलेखन
पोर्टल्स (Website/Browser) द्वारे वापर
  • chat.openai.com - माहिती तयार करणे, शंका निरसन
  • bard.google.com (Gemini) - प्रशासकीय माहिती मराठीत
  • www.canva.com - प्रेझेंटेशन, पोस्टर
  • www.notion.so - बैठकीचे मुद्दे, प्रकल्प नियोजन
5. AI चा वापर प्रशासकीय कामकाजासाठी
  • शासकीय पत्र लेखन
  • प्रस्ताव / निवेदन लेखन
  • GR चे भाषांतर
  • मिनिट्स ऑफ मिटिंग (MoM)
  • रिपोर्ट तयार करणे
  • डेटा विश्लेषण
  • योजना तुलना / विश्लेषण
  • अहवाल विश्लेषण
  • देयक तपासणे
  • टिपणी तयार करणे
  • सादरीकरण तयार करणे
  • WhatsApp संदेश लेखन
  • नागरिकांसाठी सूचना लिहिणे
  • सोशल मीडियासाठी पोस्टर
  • कार्यक्रमासाठी निमंत्रणपत्र
दस्तावेज तयार करणे: उदाहरणे
1
पत्र तयार करणे
Prompt
Response
Source- Gemini
2
प्रस्ताव तयार करणे
Prompt
Response
Source- ChatGPT
3
शासन निर्णयाचा सारांश
Prompt
Response
Source- ChatGPT
4
बैठकीचे इतिवृत्त
Prompt
Response
Source- ChatGPT
5
अहवाल तयार करणे
Prompt
Response
Source- ChatGPT
6
प्रशासकीय टिपणी तयार करणे
Prompt
Response
Source- ChatGPT
7
प्रश्नपत्रिका तयार करणे
Prompt
Response
Source- ChatGPT
माहिती विश्लेषण : उदाहरणे
1
माहिती (डेटा) विश्लेषण
Prompt
*(माहितीचा तक्ता (Chart) अपलोड करावा लागेल.)
Response
Source- ChatGPT
2
योजनांची तुलना करणे
Prompt
Response
Source- ChatGPT
संवाद आणि प्रसार : उदाहरणे
1
सादरीकरण (Presentation) तयार करणे
Prompt
Response
Source- ChatGPT
2
पोस्टर तयार करणे
Prompt
Response
Source- Gemini
3
कार्यक्रम निमंत्रण पत्रिका
Prompt
Response
Source- ChatGPT
4
नागरिकांसाठी सूचना
Prompt
Response
Source- ChatGPT
6. AI चा प्रभावी वापर करण्यासाठी उपयोगी इतर टूल्स
लेखन, नोंदी, भाषांतर
डेटा संकलन, विश्लेषण
माहिती संकलन, फीडबॅक
पोस्टर, प्रेझेंटेशन
Grammarly
इंग्रजी सुधारणा, व्याकरण
Google Calendar
वेळ व्यवस्थापन, अलर्ट
Trello / Notion
काम नियोजन व ट्रॅकिंग
iLovePDF
PDF एडिटिंग, Merge/Split
7. AI वापरताना घ्यावयाची काळजी
(सावधगिरीचे नियम)

गोपनीय माहिती शेअर करू नये
शासकीय GR नंबर, आधार नंबर, खाते क्रमांक, किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती AI टूलमध्ये टाकू नका.
AI चं उत्तर हे अंतिम नाही – पडताळणी आवश्यक
AI चं उत्तर अचूक असण्याची खात्री नाही. प्रत्येक उत्तरावर मानवी विचार व प्रशासनिक पडताळणी आवश्यक असते.
इंटरनेट कनेक्शन सुरक्षित असावं
AI टूल्स वापरताना सार्वजनिक Wi-Fi किंवा अज्ञात नेटवर्कवर लॉगिन टाळा. शक्यतो शासकीय नेटवर्क / मोबाईल डेटा वापरा.
भाषेची काळजी घ्या
AI मध्ये इंग्रजी विचारल्यास उत्तर इंग्रजीतच येईल, पण मराठीत उत्तर हवं असल्यास "मराठीत उत्तर द्या" असे लिहा.
Secure Login वापरा
AI साठी Google किंवा Microsoft खात्याचा वापर करत असाल तर 2-Step Verification सुरू ठेवा. अज्ञात AI साइट्सवर लॉगिन करू नका.
8. केंद्र आणि राज्य शासनाचे AI संबंधी धोरण
केंद्र शासन
  1. राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण (NSAI) – 2018: निती आयोगाने 'AI for All' या धोरणाची मांडणी केली.
  1. IndiaAI मिशन – 2024: ₹10,372 कोटींच्या बजेटसह IndiaAI मिशन सुरू केले आहे.
  1. कृषी क्षेत्रातील AI उपक्रम: निती आयोग आणि IBM ने AI आधारित पीक उत्पादन भाकीत मॉडेल विकसित करण्यासाठी सहकार्य केले आहे.
  1. 'Digital India' आणि e-Governance चा विस्तार: AI तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजीटल व्यवहारांना गती देणे.
  1. 'Bhashini' (AI आधारित भारतीय भाषा मंच): AI वापरून भारतीय भाषांमध्ये संवाद, भाषांतर व माहिती सुलभ करण्यासाठी.
महाराष्ट्र शासन
  1. AI धोरण 2025 साठी टास्क फोर्सची स्थापना: महाराष्ट्र सरकारने 16 सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
  1. MARVEL प्रकल्प – 2024: महाराष्ट्र पोलिसांनी MARVEL (Maharashtra Advanced Research and Vigilance for Enhanced Law Enforcement) नावाचा AI आधारित प्रकल्प सुरू केला आहे.
  1. Wadhwani AI – सामाजिक क्षेत्रातील AI उपक्रम: मुंबईस्थित Wadhwani Institute for Artificial Intelligence हा संस्था कृषी, आरोग्य, आणि शिक्षण क्षेत्रात AI आधारित उपाययोजना विकसित करते.
9. समारोप
प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता : बदलाची नवी दिशा
प्रशासन ही केवळ नियमांची आणि कागदांची यंत्रणा नसून, ती एक सेवा देणारी सजीव व्यवस्था आहे. या व्यवस्थेला वेग, अचूकता, पारदर्शकता आणि प्रभावी निर्णयक्षमता देण्यासाठी आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन ठरत आहे.
AI मुळे अधिकारी आणि कर्मचारी यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुसूत्र, जलद व गुणवत्तापूर्ण बनू शकते. शासनाच्या योजना, अहवाल, पत्रव्यवहार, बैठक व्यवस्थापन, माहिती विश्लेषण, जनजागृती, फॉर्म भरणं, भाषांतर यांसारख्या अनेक बाबींमध्ये AI प्रभावी ठरत आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे, ग्रामीण प्रशासनातही डिजिटल परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. AI वापरणं म्हणजे केवळ टेक्नॉलॉजी शिकणं नव्हे, तर "कामाचा दर्जा उंचावणं आणि लोकांच्या सेवेला आधुनिक रूप देणं" होय.
AI हे आपलं स्मार्ट सहाय्यक आहे – निर्णय घ्यायला मदत करणारा. प्रशासनात AI वापरून वेळेची बचत, शुद्धता, आणि उत्तरदायित्व वाढवता येतं. प्रत्येक कर्मचारी AI चा वापर करून सक्षम, सजग आणि आधुनिक अधिकारी बनू शकतो.
AI सोबतच्या आपल्या प्रवासास आपणास मन:पूर्वक शुभेच्छा!..!!!!!
धन्यवाद…!!!!